AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Meeting Update | फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?

Cabinet Meeting Update | फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?

| Updated on: May 05, 2026 | 3:03 PM
Share

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांतील आरोपींना पॅरोल देऊ नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासाठी आवश्यक ते कायद्यात बदल करण्याचे आदेशही त्यांनी विधी व न्याय विभागाला दिले आहेत.

या बैठकीत राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. विशेषतः गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश सरकारकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, नसरापूर प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. आरोपी भीमराव कांबळे यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांकडून ही प्रक्रिया राबवली जाणार आहे.
विशेष म्हणजे, आरोपीच्या कुटुंबीयांनीही त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तपास वेगाने सुरू असून, लवकरच न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

Published on: May 05, 2026 03:03 PM
Follow Us