Maharashtra | महाराष्ट्रात आज आरोग्य विभागाची गट ‘ड’ वर्गासाठी परीक्षा

गट क परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रावरच ही परीक्षा घेतील जात आहे. गट क वर्गाच्या पेपरवेळी तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले होते.त्यामुळे गट ड वर्गाची परीक्षा ही एमपीएससीमार्फत घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाने यामध्ये कोणताही बदल केला नव्हता.

गेल्या काही दिवसांपासून अकार्यक्षम व्यवस्थापन आणि तांत्रिक गोंधळामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आरोग्य विभाग रविवारी पुन्हा एकदा ‘परीक्षेला’ सामोरा जाणार आहे. आज राज्यभरात आरोग्य विभागाची गट ड वर्गासाठी परीक्षा पार पडत आहे. 3464 पदांसाठी राज्यभरात 1364 परीक्षा घेण्यात येईल. दुपारी 2 वाजता परीक्षेला सुरुवात होईल. यापूर्वीचा अनुभव पाहता निदान आजतरी परीक्षा सुरळीत पार पडणार का, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. गट क परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या केंद्रावरच ही परीक्षा घेतील जात आहे.
गट क वर्गाच्या पेपरवेळी तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले होते.त्यामुळे गट ड वर्गाची परीक्षा ही एमपीएससीमार्फत घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. परंतु, आरोग्य विभागाने यामध्ये कोणताही बदल केला नव्हता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI