Gondia Video : वाहssss जबरदस्त….गोंदियाच्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य एकदा बघाच
गोंदिया जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस पडल्याने गोंदिया जिल्ह्यातील धरण तुडुंब भरलेली आहेत. बघा गोंदियाच्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य....
मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाने नागरिकांचं जनजीवन चांगलंच विस्कळीत केलं आहे. सतत होणाऱ्या पावसाने नद्या, नाले तुडूंब भरून वाहू लागलेत. अशातच गोंदिया जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचाही प्रश्न मिटलाय. गोंदिया जिल्ह्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केल्याने गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. इटियाडोह धरणात 100 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती मिळतेय. सिंचनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेला गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील इटियाडोह धरण देखील ओव्हर फ्लो झालेलं आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य काश्मीत भेंडारकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेले आहेत.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

