Shirpur Milk Adulteration : तुम्ही पित असलेलं दूध कसंय? दूध आहे की रबर? बघा धक्कादायक VIDEO
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातून समोर आलेल्या दुधाच्या व्हिडिओने खळबळ उडवली आहे. उकळल्यानंतर रबरासारख्या दिसणाऱ्या या दुधामुळे भेसळीचे गंभीर स्वरूप समोर आले आहे. युरिया, डिटर्जंट, पाम तेल असे अनेक पदार्थ दुधात मिसळले जात असताना, अन्न व औषध प्रशासन (FDA) केवळ दिवाळी-दसरलाच कारवाई करते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडिओने राज्यातील दूध भेसळीचे भीषण वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले आहे. एका महिलेने शिरपूरमधील विक्रेत्याकडून खरेदी केलेले दूध काही तासांतच खराब झाले. ते उकळले असता, भिजत घातलेल्या कपड्यांप्रमाणे रबरासारखे पिळता येणारा एक पदार्थ तयार झाला, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
या प्रकाराने अन्न व औषध प्रशासन (FDA) च्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरवर्षी केवळ दिवाळी-दसऱ्याला मावा-खव्याच्या दुकानांवर छापे टाकणारे हे खाते महाराष्ट्रात खरोखरच कार्यरत आहे का, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. दुधामध्ये युरिया, डिटर्जंट पावडर, पाम तेल, माल्टोडेक्सट्रिन, स्टार्च, कॉस्टिक सोडा, फॉर्मेलिन किंवा हायड्रोजन पॅरॉक्साइड यांसारख्या अनेक हानिकारक पदार्थांची भेसळ केली जात असल्याचे उघड झाले आहे.
यामुळे दुधाचा रंग, जाडी, फॅट आणि टिकाऊपणा वाढवला जातो. भेसळीची ही कीड तांदळापासून औषधांपर्यंत पोहोचली असताना, सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. महाराष्ट्रात भेसळ तपासणीसाठी केवळ 11 प्रयोगशाळा उपलब्ध असून, एका फूड इन्स्पेक्टरवर चार-चार तालुक्यांचा भार आहे. ही आकडेवारी प्रशासनाच्या अपुऱ्या तयारीचे आणि गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्ट करते.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

