ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर 1 सप्टेंबरला मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. दौंड, इंदापूर, फलटण, बारामती आणि पुरंदर तालुक्यांमधून हजारो वाहनांची रॅली मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरुवातीला किमान एक लाखांचा जनसमुदाय सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पिवळ्या झेंड्यांसह ओबीसी समाज मुंबईकडे कूच करणार असून, हे देशातीलच नव्हे तर जगातील […]
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर 1 सप्टेंबरला मोठं आंदोलन उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. दौंड, इंदापूर, फलटण, बारामती आणि पुरंदर तालुक्यांमधून हजारो वाहनांची रॅली मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरुवातीला किमान एक लाखांचा जनसमुदाय सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पिवळ्या झेंड्यांसह ओबीसी समाज मुंबईकडे कूच करणार असून, हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठं ओबीसी आंदोलन ठरेल, असा दावा करण्यात आला. या आंदोलनासाठी गावागावांतून वाहनांची तयारी आणि वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आलं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात संघर्ष उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
Published on: Aug 20, 2026 10:22 PM
Follow Us
Latest Videos
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब

