देशात दोन सरकार, बागेश्वर धाम अन् केंद्र सरकार, कुणी केली सडकून टीका
देशात दोन सरकार, एक म्हणजे बागेश्वर धाम अन् दुसरं केंद्र सरकार, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या दोघांमध्येही श्रेष्ठ सरकार कोण याची स्पर्धा सुरु असल्याचा हल्लाबोलही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
मुंबई, ९ नोव्हेंबर २०२३ | देशात दोन सरकार, एक म्हणजे बागेश्वर धाम अन् दुसरं केंद्र सरकार, अशी टीका राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या दोघांमध्येही श्रेष्ठ सरकार कोण याची स्पर्धा सुरु असल्याचा हल्लाबोलही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. राज्य सरकारवर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘दोन पर्यायी सरकार आहेत. पहिलं बागेश्वर धाम सरकार आणि दुसरं दिल्ली सरकार या दोन स्पर्धा लागली आहे. सर्वात श्रेष्ठ कोण? याची दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे. ‘, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. तर मराठा आरक्षणावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकार तत्परता दाखवते, पटापट निर्णय घेते तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण आवाहन देणाऱ्या याचिकेवर सरकार गंभीर दिसत नाही. या दोन समाजात तेढ निर्माण झाली असताना सरकारला ओबीसीकडे दुर्लक्ष करायचे आहे? काय चाललं आहे सरकार मध्ये.. असा सवालही त्यांनी केला.