Uddhav Thackeray : ठाकरेंनी घेतली नार्वेकर अन् राम शिंदेंची भेट, विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवरून काय ठरलं? 2 दिवसांत…
नागपूरमधील हिवाळी अधिवेशन दोन दिवसात संपणार आहे पण अद्याप विरोधी पक्ष नेते पदाची नियुक्ती झाली नाहीये त्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर आणि राम शिंदे यांची भेट घेतली.
उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती करावी या मागणीसाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदेची भेट घेतली. महायुतीचे सरकार येऊन आणि मुख्यमंत्रीपदी फडणवीस विराजमान होऊन तीन अधिवेशन झालीत आता नागपूरचे हिवाळी अधिवेशनही संपत आलय. पण अद्याप महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळालेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आधी राहुल नार्वेकरांची आणि नंतर राम शिंदेची भेट घेतली आणि अधिवेशन संपण्याआधी विधानसभा आणि विधानपरिषद दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती करावी अशी मागणी केली.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडन विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. तर ऑगस्ट मध्ये अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपला म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून विधान परिषदेला विरोधी पक्षनेता नाही. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस कडून सतीश पाटील यांचं नाव देण्यात आलय. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी संख्याबळावरती बोट ठेवलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर

