Maharashtra Farmer Aid Row : शेतकऱ्यांची मदत बाजूला अन् CM, PM केअर फंडावरुन ठाकरे Vs फडणवीसांमध्ये जुंपली
शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावर कोरोनाकाळातील निधीचा विषय आणत एकमेकांवर टीका केली जात आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीआरएफच्या निकषांपलीकडे जाऊन मदत करण्याचे आश्वासन दिले असून, निधीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. तरीही शेतकऱ्यांसाठीच्या मदतीऐवजी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
महाराष्ट्राला नुकत्याच बसलेल्या अतिवृष्टीच्या फटक्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यांना तातडीने सरकारी मदतीची अपेक्षा आहे. मात्र, मदतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये, विशेषतः उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात पीएम आणि सीएम केअर फंडावरून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची आणि त्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, या फंडात लाखो कोटी रुपये जमा असून, महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपयांची तातडीची मदत दिल्यास राज्यातील संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकते. यावर पलटवार करताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळातील सीएम केअर फंडाचा मुद्दा उपस्थित केला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

