Maharashtra Rain : 1950 नंतर मेमध्ये रेकॉर्ड, 107 वर्षानंतर विक्रमी पाऊस? झलक दाखवून मान्सून होणार गायब? IMD नं काय म्हटलं?
परवा मान्सूनने जोरदार ट्रेलर दाखवला असला तरी यापुढचे काही दिवस खास करून शेतीच्या कामांसाठी पावसाची वाट पाहावी लागू शकते असा अंदाज व्यक्त केला जातोय.
मान्सून त्याच्या नेहमीच्या तारखेपेक्षा 16 दिवस आधीच मुंबईत पोहोचला. मे महिन्यात इतक्या लवकर मान्सून येणं हे 1950 नंतर पहिल्यांदाच घडल्याचा दावा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केलाय. हवामान विभागाच्या दाव्यानूसार मे महिन्यात सर्वाधिक पावसाचा 107 वर्षाचा विक्रम मोडला गेला. दरम्यान अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे परिस्थिती बिघडत असल्याने आयएमडीने रेड अलर्ट जारी केलाय. पण काही हवामान तज्ज्ञ 5 पाच जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून फारसा सक्रिय राहणार नसल्याचं सांगतायत. अभ्यासक डॉक्टर अक्षय देवरास यांच्या मते परदेशातल्या हवामान बदलाचा परिणाम भारतीय हवामानावर होण्याची शक्यता आहे. 27 मे ला पश्चिम रशियावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज वर्तवला जातोय. त्याचा महाराष्ट्रासह काही भारतीय राज्यातल्या वातावरणावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या कोरड्या हवेमुळे 27 मे नंतर पाऊस लांबेल असंही सांगितलं जातंय. बघा नेमका काय व्यक्त केला अंदाज?
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत

