Rupali Chakankar : फलटण प्रकरणानं आयोग गोत्यात…मेकअप करके खडी, तो सबसे बडी; चाकणकरांविरोधात पोस्टरबाजी
फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मृत महिलेच्या चॅटिंगवर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. दादा गटातील रूपाली ठोंबरे यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधकांनी चाकणकर यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक तुषार दोषी आणि मंत्री जयकुमार गोरे यांची विधानेही वादात आहेत.
फलटणमधील मृत महिला डॉक्टर प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सातारा पोलीस निरीक्षक तुषार दोषी आणि भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीव्र वादंग सुरू आहे. मृत महिलेच्या तपासाऐवजी चाकणकर यांनी तिच्या चॅटिंग आणि वैयक्तिक संबंधांवर भाष्य केल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दादा गटातील रूपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आंदोलन करत, “मी मेकअप करके खडी तो सबसे बडी” असे पोस्टर लावून निषेध व्यक्त केला. काँग्रेससह इतर विरोधकांनीही चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी अजित पवारांनीही आपली नाराजी व्यक्त केली आहे, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुषार दोषींवर पीडितेचे सीडीआर लीक केल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
पार्थ अजित पवारांचे 42 कोटीही वाचवणार? दमानियांचा दावा काय?
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर

