सत्याचा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर CSMT परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
महाविकास आघाडी व मनसेच्या सत्याचा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सीएसएमटी परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदार यादीतील अनियमिततेविरोधात आयोजित या मोर्चासाठी राज्यभरातून कार्यकर्ते येत आहेत.
मुंबईत आज महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या वतीने सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी एक वाजता सुरू होणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रेल्वेमार्गे मुंबईकडे येत आहेत. मतदार यादीतील अनियमितता, बोगस मतदार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा मोर्चा काढण्यात येत आहे.
या महत्त्वपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस दलाची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलीस विशेष काळजी घेत असून, अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

