नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम, महत्त्वाच्या बैठकीला बड्या नेत्यांची दांडी
जळगाव आणि नाशिकमधील महायुतीतील बंड अखेर शमल्याचे चित्र दिसत आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अखेर माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे
जळगाव आणि नाशिकमधील महायुतीतील बंड अखेर शमल्याचे चित्र दिसत आहे. जळगाव विधान परिषद निवडणुकीतील शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी अखेर माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर जळगावात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीला शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार अमोल पाटील, आमदार किशोर पाटील तसेच भाजप आमदार मंगेश चव्हाण उपस्थित होते. बैठकीपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी मोबाईलवर रेश्मा काळे यांची प्रतिक्रिया ऐकून घेतली. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन देखील बैठकीत सहभागी झाले होते.
दरम्यान, अनेक ठिकाणी घेतल्या जाणाऱ्या बैठकांमध्ये नेते गैरहजर असल्याचं चित्र आहे. अलीकडेच सातारा सांगली विधान परिषदेसाठी घेतल्या गेलेल्या बैठकीत बडे नेते गैरहजर होते. यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांचाही समावेश आहे. याशिवाय अनेक ठिकाणी भजपच्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित असल्याचं दिसून आलं आहे.
Published on: Jun 13, 2026 02:09 PM
नाशिक पाठोपाठ जळगावमधील बंडही शमलं; मात्र महायुतीतील नाराजी कायम
हर्षवर्धन सपकाळांविरोधातील तक्रारींची हायकमांडकडून दखल
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....

