Eknath Shinde Meet Amit Shah | भाजपचा फॉर्म्युला शिंदेंनी फेटाळला?; महायुतीत हायव्होल्टेज ड्रामा सुरूच…जागावाटपावरून शिंदे थेट दिल्ली दरबारी!
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागांच्या वाटपावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा तिढा निर्माण झाला आहे. एकूण 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागांच्या वाटपावरून जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने सुचवलेला जागावाटपाचा फॉर्म्युला शिंदे गटाने पूर्णपणे फेटाळून लावला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी थेट दिल्ली गाठल्याची माहिती समोर आली आहे. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत चर्चा करून शिवसेनेची भूमिका मांडणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने स्वतःकडे 11 जागा ठेवून शिवसेनेला 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र शिवसेनेने किमान 6 ते 7 जागांची मागणी करत नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी या जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जात असून या जागांवर कोणत्याही परिस्थितीत माघार न घेण्याची भूमिका शिंदे गटाने घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मुंबईत झालेली मॅरेथॉन बैठक निष्फळ ठरल्याची माहिती आहे. त्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही पुणे आणि इतर काही जागांवरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता अमित शाह यांच्या मध्यस्थीनंतर महायुतीचा अंतिम जागावाटपाचा फॉर्म्युला काय ठरणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Published on: May 27, 2026 12:08 PM
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र

