विधानपरिषद निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला काय? मंत्री बावनकुळेंनी दिली माहिती
महायुतीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागांवरून जोरदार चर्चा सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्राथमिक चर्चेनुसार 17 जागांपैकी भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढण्याचा फॉर्म्युला समोर आला होता.
महायुतीमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागांवरून जोरदार चर्चा सुरू असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्राथमिक चर्चेनुसार 17 जागांपैकी भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर लढण्याचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र शिवसेनेकडून अधिक जागांची मागणी करण्यात आल्याने महायुतीतील चर्चा आणखी रंगली आहे.
आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीनंतर बावनकुळे यांनी महायुती सर्व 17 जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे, ती त्यांनाच देण्याचा विचार सुरू असून त्यानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवेळीही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. अंतिम चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत पूर्ण होण्याची शक्यता असून भाजप अधिक जागांवर निवडणूक लढवू शकते.
Published on: May 23, 2026 02:45 PM
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...

