‘गरिबाला गरीब जिल्हा…’, झिरवाळांकडून खदखद व्यक्त; पालकमंत्रीपदावरून अद्याप महायुतीत नाराजी
झिरवाळांना गरीब म्हणण हे अदानींच अपमान ठरेल असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. नरहरी झिरवाळ यांना गरीब म्हणण म्हणजे हा गौतम अदानींचा अपमान ठरेल. गरीब माणूस हा प्रामाणिक असतो निष्ठावान असतो खाल्ल्या मिठाला जागतो, असं संजय राऊत म्हणाले.
पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. गरिबाला गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलं, असं म्हणत नरहरी झिरवाळ यांनी हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून मनातील खदखद मांडली. दरम्यान, महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवाळ नाराज असल्याची चर्चा आहे. गरिबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केल्याचा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी वक्तव्य केलं. तर पालकमंत्रीपदबाबत श्रद्धा आणि सबुरी ठेवणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय. दुसरीकडे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद कायम आहे. स्थगिती दिलेल्या जिल्ह्यातील दोन मंत्र्यांकडून ध्वजवंदन करण्यात आलंय. नाशिकमध्ये महाजन तर रायगडमध्ये आदीती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. दोन्ही जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती तरी ध्वजवंदनाची जबाबदारी दोन्ही मंत्र्यांवर दिल्याचे पाहायला मिळाले. रायगडवासीयांच्या वतीने ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला, अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिलीये. ‘बहुमान मिळणं हा कुठल्याही लोकप्रतिनिधीच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असतो. त्यामुळे निश्चितपणाने मला आज आनंद आहे, अभिमान आहे की रायगडवासीयांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज ध्वजारोहण करण्याचा मान मला मिळाला’, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं. तर दुसरीकडे पालकमंत्री पदबाबत देवालाच ठाऊक असल्याचे म्हणत गिरीश महाजनांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. बघा व्हिडीओ…
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

