AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

Mahesh Tutorials | महेश ट्युटोरियल्सचा मोठा धक्का! राज्यभरातील 33 सेंटर अचानक बंद; 2,500 विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी

| Updated on: Jul 17, 2026 | 11:35 AM
Share

मुंबईसह राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून, महेश ट्युटोरियल्सची तब्बल 33 कोचिंग सेंटर्स अचानक बंद करण्यात आली आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता घेतलेल्या या निर्णयामुळे सुमारे 2,500 विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि शैक्षणिक नियोजनावर गंभीर परिणाम झाला आहे. सर्वप्रथम मुलुंड येथील शाखेला टाळे लागल्याची माहिती समोर आली असून, याच शाखेतून या घडामोडींची सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश ट्युटोरियल्सने पालकांची बैठक बोलावून विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी त्यांचे अरिहंत अकॅडमीमध्ये हस्तांतरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून त्यांचे शिक्षण पूर्ववत सुरू राहील, असेही संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

1988 मध्ये स्थापन झालेली महेश ट्युटोरियल्स ही मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कोचिंग संस्थांपैकी एक मानली जात होती. मात्र, संस्थेची मूळ कंपनी एमटी एज्युकेअर डिसेंबर 2022 पासून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) समोर दिवाळखोरी प्रक्रियेत असून, गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.

दरम्यान, संस्थेवर सुमारे 32.33 कोटी रुपयांचे थकित कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या ऑडिटमध्येही कंपनीच्या आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आर्थिक संकट अधिक तीव्र झाल्याने अखेर संस्थेला कोचिंग सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे समोर येत आहे.

या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भरलेले शुल्क, अभ्यासक्रमाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत अनेक पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत विविध धर्मादाय संस्थांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. तसेच, खासगी कोचिंग संस्थांवर प्रभावी नियमन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, मुलुंड येथून सुरू झालेल्या महेश ट्युटोरियल्सच्या एकेकाळी राज्यभरात सुमारे 60 शाखा, तर केवळ मुंबईत 40 शाखा कार्यरत होत्या. या घडामोडीमुळे हजारो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आता सरकार आणि संबंधित संस्थेच्या पुढील निर्णयांकडे लागले आहे.

Published on: Jul 17, 2026 11:35 AM

Follow Us