Wardha | ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव प्रेमींना रोमांचित करणारे दृश्य पाहायला मिळाले आहे. प्रकल्प परिसरात एका रुबाबदार वाघाची ऐटीत चाल कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. अमरावतीचे वन्यजीव छायाचित्रकार अमेय ठाकरे यांनी हे दुर्मिळ दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे.

जंगल परिसरात हरणांचा कळप शांतपणे उभा असताना अचानक वाघ त्या दिशेने चालत येताना दिसला. विशेष म्हणजे, वाघ समोरून जात असतानाही हरणांचा कळप काही अंतर राखून अत्यंत सावधपणे उभा असल्याचे या दृश्यात दिसून येते. वाघाची रुबाबदार चाल आणि हरणांची सतर्कता यामुळे हा क्षण अधिकच थरारक बनला आहे.
दरम्यान, बोर व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आणि वन्यजीवांची उपस्थिती पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, वन्यजीव छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
Published on: May 17, 2026 01:20 PM
चादर धुतली अन् सापडलं Made in Pakistan! व्हायरल व्हिडिओने उडवली खळबळ
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक
स्वारगेटमध्ये मनसेचा आक्रमक पवित्रा; एसीएफ स्टडी सेंटरवर धाड
म्हणून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी मिळाली, रोहित पवारा यांचा मोठा दावा