AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | Malegaon | मालेगाव महापालिकेत नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; निषेधार्थ हनुमान चालिसाचे पठण, राजकीय वातावरण तापले

tv9 Marathi Special Report | Malegaon | मालेगाव महापालिकेत नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल; निषेधार्थ हनुमान चालिसाचे पठण, राजकीय वातावरण तापले

| Updated on: Feb 26, 2026 | 10:57 AM
Share

कायम चर्चेत असलेल्या मालेगाव महानगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महापालिकेच्या कार्यालयात नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्ष आक्रमक झाले आहेत.

कायम चर्चेत असलेल्या मालेगाव महानगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महापालिकेच्या कार्यालयात नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्ष आक्रमक झाले आहेत. महापालिकेच्या कार्यालयात नमाज पठण झाल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनात हनुमान चालिसाचे पठण केले. दरम्यान, लोक संघर्ष समितीने शहरातील पथदिव्यांच्या समस्येबाबत महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संघर्ष समितीचे कार्यकर्ते विद्युत विभागाच्या अधीक्षकांना भेटण्यासाठी महापालिकेत आले होते. अधिक्षक बैठकीसाठी बाहेर गेल्याने कार्यकर्ते त्यांच्या दालनातच थांबले. अधिक्षक येण्यास विलंब झाल्याने आणि त्याचवेळी नमाजची वेळ झाल्याने दालनातच नमाज पठण करण्यात आल्याचा दावा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती आहे. तसेच दोन दिवसांत नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास महापालिकेचे गोमूत्राने शुद्धीकरण करण्याचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिला आहे. यापूर्वीही महापालिकेत टिपू सुलतान याच्या फोटोवरून वाद निर्माण झाला होता. आता नमाज पठणाच्या घटनेमुळे मालेगावातील राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे. प्रशासनाकडून पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Feb 26, 2026 10:57 AM

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या