Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण – खर्गे
राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात घमासान सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, हा मुद्दा मला राजकीय बनवायचा नाही, मात्र भाजपची कृतीच तशी आहे.

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसच्या ‘विजय शंखनाद’ रॅलीदरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जनतेला संबोधित करण्यासाठी वापरलेल्या मंचाच्या ‘शुद्धीकरणा’वरून वाद निर्माण झाला आहे. खर्गे यांच्या भाषणानंतर हिंदू संघटनांनी हा मंच शुद्ध करण्यासाठी धार्मिक विधी केले; या कृतीचा उत्तराखंड काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे अध्यक्ष गणेश गोदियाल यांनी याला भाजपच्या संकुचित मानसिकतेचे उदाहरण म्हटले आहे. त्यांनी नैनितालच्या एसएसपींकडे निष्पक्ष चौकशी करून कायद्याचे उल्लंघन झाल्यास दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी खर्गे यांना सांगितले आहे की, आम्ही तुमचा आदर करतो, मात्र तुम्ही थेट आरोप करू शकत नाही. तुम्ही भर सभेत आमच्यावर आरोप करत आहात, आम्ही केले का ते? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. पुढे ते म्हणाले की, ही कृती आम्हांलादेखील पटलेली नाही, आम्ही ही कृती करणाऱ्यांवर कारवाई करू. हा काही सभागृहात चर्चेचा मुद्दा नाही.
Published on: Aug 13, 2026 12:49 PM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...