“असं पुन्हा कोणी करू नये म्हणून कठोर शिक्षा झालीच पाहिजे”, केतकी चितळे प्रकरणावर मानसी नाईकची प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता कलाविश्वातील अनेक मंडळींनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आता कलाविश्वातील अनेक मंडळींनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. असं पुन्हा कोणी करू नये म्हणून कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया मानसी नाईकने दिली. “मी जेव्हा ती पोस्ट वाचली, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. आपण मराठी आहोत, मराठी कलाकाराने असं कुणाबाबतही बोलणं अत्यंत लज्जास्पद आहे. केतकीने जे केलं ते बरोबर नाही. असं कोणीच करू नये. असं पुन्हा कोणी करू नये म्हणून कठोर शिक्षा झालीच पाहिजे. लोकांनी अशी पोस्ट लिहिण्यापूर्वी किंवा बोलण्यापूर्वी दोनदा विचार करायला हवा,” असं मानसी म्हणाली.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

