AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! मंचरच्या मशिदीखाली सापडलं भुयार! परिसरात तणाव

धक्कादायक! मंचरच्या मशिदीखाली सापडलं भुयार! परिसरात तणाव

| Updated on: Sep 13, 2025 | 11:06 AM
Share

पुण्यातील मंचर येथील एका मशिदीच्या बांधकामादरम्यान भूयाराचा शोध लागल्याने वाद निर्माण झाला आहे. हिंदू आणि मुस्लिम संघटना यांच्यात वेगवेगळे दावे केले जात आहेत. पुरातत्व विभाग या भूयाराची पाहणी करणार आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात एका मशिदीच्या बांधकामादरम्यान भूयाराचा शोध लागल्याने वाद निर्माण झाला आहे. चावडी चौकातील मशिदीच्या बांधकामात भिंत कोसळल्याने हा भूयार दिसून आला. हिंदुत्ववादी संघटनांचा दावा आहे की हा भूयार प्राचीन हिंदू वास्तूचा अवशेष असू शकतो. तर मुस्लिम बांधव या दरग्याचे 400 वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगत आहेत. दोन्ही बाजूंनी वेगवेगळे दावे केल्याने वातावरण तणावाने भरले आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, पुरातत्व विभाग या भूयाराची पाहणी करणार आहे. प्रशासनाने न्यायालयाचा आदेश येईपर्यंत पुढील बांधकाम थांबवले आहे.

Published on: Sep 13, 2025 11:06 AM