Manikrao Kokate : मग ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषिमंत्र्यांचं बेताल विधान
Nashik news : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करताना वादग्रस्त विधान केलं आहे. त्यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? असं विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे. आज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणी दरम्यान त्यांनी हे विधान केलं आहे. अधिकारी उभ्या पिकाचे पंचनामे करत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने कोकाटे यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. दरम्यान, आपण काय चुकीचं बोललो असं म्हणत कोकाटे आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत.
यावर स्पष्टीकरण देताना कोकाटे म्हणाले की, मी तसं बोललोच नाही, बऱ्याच ठिकाणी पेरणी संपली आहे. फळबागाचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे फळबागाचे पंचनामे करण्याचे सांगितले आहे. बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये माल कमी आहे. जेवढं नुकसान झाला आहे, तेवढे पंचनामे करण्याचे सांगितले आहेत. त्याची नुकसान भरपाई देणार आहे. काही ठिकाणी कांद्याची लागवड केल्याने, कांद्याचे नुकसान झालं आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नांगरलं आहे, शेतीची मशागत करण्यासाठी नांगरटी करावीच लागते. आता सोयाबीन, कापूस शिल्लक आहे का? त्यामुळे फळबागा उभ्या आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत असं कोकाटे म्हणाले.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

