‘ते’ गंभीर आरोप, जरांगे पाटलांचा पलटवार; मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळच्या नेत्याचं घेतलं नाव
अजय महाराज बरासकर यांनी काल मनोज जरांगे यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले. या आरोपांना मनोज जरांगे यांनी आज उत्तर दिलं. ते म्हणाले, अजय बरासकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप....
जालना | 22 फेब्रुवारी 2024 : किर्तनकार आणि मनोज जरांगे पाटील यांचे जिवलग मित्र अजय महाराज बरासकर यांनी काल मनोज जरांगे यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले. या आरोपांना मनोज जरांगे यांनी आज उत्तर दिलं. ते म्हणाले, अजय बरासकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक नेता आहे. त्याचा यामध्ये हात आहे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी अजय बारसकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. तर बारसकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप करण्यासाठी ४० लाख रूपये घेतले असाही गंभीर आरोप त्यांनी केला. पुढे जरांगे असेही म्हणाले, गेली १९ वर्ष झाले मला कोणतेच चॅनल उपलब्ध झाले नाहीत आणि याला एका दिवसात इतके चॅनल उपलब्ध कसे झालेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर सरकारमधील कोणत्या नेत्यानं अजय बारसकर यांनी साथ दिल्यास पक्षाचं वाटोळं होणार असल्याचा इशाराच जरांगेंनी दिलाय.
Published on: Feb 22, 2024 04:59 PM
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
