कोकणातलं फणस सुद्धा उठलं… मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा नारायण राणेंना डिवचलं
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर नारायण राणे यांनीदेखील पलटवार केला आहे. मी मराठवाड्याचा दौरा कऱणार, काहीजण सरकारला आव्हान देत आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले आणि अप्रत्यक्षपणे मनोज जरांगे पाटलांना त्यांनी उत्तर दिलंय. बघा काय म्हणाले मनोज जरांगेंच्या टीकेवर नारायण राणे?
देवेंद्र फडणवीस यांच्या नादी लागून मराठ्यांच्या आंगावर येऊ नका, असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे. अन्यथा तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठे राहणार नाहीत, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावरही जिव्हारी लागणारी टीका केली आहे. कोकणातलं फणस सुद्धा उठलं, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना डिवचल्याचे पाहायला मिळाले. तर मराठ्यांच्या सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुढे ते असेही म्हणाले, ‘२५ ते ३० टक्के आरक्षण बाकी आहे. सगेसोयऱ्याचं अमंलबजावणी झाली की सगळे मराठे ओबीसीमध्ये… झाला विषय खल्लास…. आणि जर सगेसोयऱ्याची अमंलबजावणी नाही झाली तर मराठ्यांच्या सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताच पाडायची’, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.