मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम अन् दिला वैद्यकीय उपचारास नकार; म्हणाले, ‘… हेच माझ्यावर उपचार’
VIDEO | उपोषणाच्या १४ व्या दिवशीही मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आपल्या मागणीवर ठाम, वैद्यकीय उपचार घेण्यास नकार देत आजही उपोषण सुरू, म्हणाले...
जालना, ११ सप्टेंबर २०२३ | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यातील उपोषणाचा आजचा १४ वा दिवस असून आजही मनोज जरांगे पाटील हे ‘मराठा समाजाला सरसकट ओबीसी जातीचं प्रमाणपत्र द्यावे’, या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, कालपासून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिण्यास आणि औषधांचे सेवन करण्याचा त्याग केला आहे. यासोबत आता त्यांनी वैद्यकीय तपासणी किंवा उपचारांना देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली दिसत आहे. माध्यमांशी बोलताना मराठा आरक्षण माझी वेदना आहे तर मराठा आरक्षण हेच माझ्यावर उपचार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तर सर्व पक्षीयांनी मराठा समाजाच्या पाठिशी उभं राहावं, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांने म्हटलं आहे.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला

