तर तुम्हाला रस्त्यावरही फिरू देणार नाही! जरांगेंचा थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेटच्या त्वरित अंमलबजावणीची मागणी केली आहे. सरकारने तडजोड न केल्यास पुन्हा रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सातारा गॅझेटच्या लागू करण्याबाबत सरकारला कठोर इशारा दिला आहे. त्यांच्या मते, सातारा गॅझेट लवकरच लागू न झाल्यास ते पुन्हा रस्त्यावर आंदोलन करतील. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरसंदर्भातही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या बैठकीला अभ्यासक येत नाहीत आणि फक्त टीव्हीवरच दिसतात. जरांगे पाटील यांचे हे विधान मराठा आरक्षणाबाबत निर्माण होणाऱ्या संभ्रमावर रोख ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Published on: Sep 04, 2025 04:49 PM
Latest Videos
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...

