छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास…., मनोज जरांगे पाटलांचा इशारा काय?
नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला आहे. छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास काय करायचं, त्यावर योग्यवेळी भूमिका घेणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलंय
मनोज जरांगे पाटील ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करतायेत. अशातच नाशिक लोकसभेतून छगन भुजबळांनी फक्त उभं राहावं, मग आमची भूमिका सांगतो, असा इशारा जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिला आहे. छगन भुजबळ लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास काय करायचं, त्यावर योग्यवेळी भूमिका घेणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य करून छगन भुजबळ यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिला आहे. तर इतर लोकसभा मतदारसंघातील भूमिका समाजानेच ठरवावी, अशा सूचनाही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला दिल्यात. आज पुण्यातील देहूत संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळांबद्दल जास्तीचं काही विचारू नका, त्यांनी लोकसभा लढायचं अंतिम केल्यावर सांगतो, असा इशारा जरांगेनी भुजबळांना दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढा सुरू असताना ओबीसी नेते छगन भुजबळ आणि जरांगेंमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली होती. अशातच भुजबळ नाशिक लोकसभेतून नशीब अजमावणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यालाच अनुसरून पत्रकारांनी जरांगेना छेडलं असता, मराठा समाजाला राज्यभर कोण-कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं हे ठरवावं. पण नाशिक लोकसभेत जर भुजबळ उभे राहिले, तर मग तिथं काय भूमिका घ्यायची हे मी त्यावेळी सांगतो. असा इशारा जरांगेनी थेट भुजबळांना दिला.
Published on: Apr 07, 2024 07:44 PM
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
