जरांगे पाटील यांची तयारी पूर्ण अन् गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात याचिका, मुंबईत येण्याची परवानगी…
मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची परवानगी मिळणार की नाही ? मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीला जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मात्र यापूर्वीच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
मुंबई, १६ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील हे २० जानेवारीला जालन्यातील अंतरवाली सराटी या गावातून मुंबईच्या दिशेने निघणार आहे. मात्र यापूर्वीच वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची परवानगी देऊ नका, अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढच्या पाच दिवसात मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह उपोषणासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. या दौऱ्याचा रोड मॅप जरांगे पाटील यांनी सांगितला. सात दिवसांचा प्रवास करत मनोज जरांगे पाटील मुंबईत आमरण उपोषणासाठी दाखल होतील. सकाळी ८ वाजल्यापासून पायी आणि दुपारी १२ नंतर वाहनांनी प्रवास करणार आहे. 20 जानेवारीला सकाळी 9.00 वाजता अंतरवाली सराटीपासून पद यात्रा सुरू होईल. दुपारी कोळगाव, ता. गेवराई येथे भोजन आणि मातोरी, ता. शिरूर येथे रात्री मुक्काम असणार आहे. त्यानंतर त्यांचा पुढील प्रवास सुरू होणार आहे. बघा कसं असणार मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा रोड मॅप?
Published on: Jan 16, 2024 10:36 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
