“आई-बापाचा तपास नाही लागला”, इर्शाळवाडीत महिलेचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश
रायगडमधल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याची घटना घडली आहे. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. ही घटना घडताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत टाहो फोडला आहे.
रायगड | 20 जुलै 2023 : रायगडमधल्या इर्शाळवाडी गावावर दरड कोसळ्याची घटना घडली आहे. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 25 जणांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. तर सात जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. घटनास्थळी सध्या अतिशय शोकाकूल वातावरण आहे. हे गाव दरडीखाली दबलं गेल्याने शेजारच्या गावातील लोक आपल्या नातेवाईकांच्या काळजीपोटी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आमच्या नातेवाईकांना वाचवा, अशी विनंती स्थानिक लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करत आहेत.
Published on: Jul 20, 2023 10:44 AM
Follow Us
Latest Videos
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
