Nanded Corona | अनेकांना मास्कचा विसर, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांच्या स्वागतासाठी गर्दी
संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या खासदारांचे नांदेडमध्ये जोरदारपणे स्वागत झालय. संसदेच्या शून्य प्रहारामध्ये नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार पाटील आज नांदेडमध्ये येताच विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
संसदेत मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडणाऱ्या खासदारांचे नांदेडमध्ये जोरदारपणे स्वागत झालय. संसदेच्या शून्य प्रहारामध्ये नांदेडचे खासदार प्रताप पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे खासदार पाटील आज नांदेडमध्ये येताच विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊन त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा फज्जा उडवत हजारो कार्यकर्त्यांनी खासदारांच्या स्वागतासाठी गर्दी केली, त्यांनतर शहरात खासदारांची मिरवणूक काढत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय. खासदारांच्या स्वागतासाठी मोटारसायकलची रैली देखील काढण्यात आली, या मोठ्या ताफयामुळे शहरात वाहतुकीचे मात्र तीनतेरा वाजले होते.
Follow Us
Latest Videos
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर

