‘मराठा नेते काय करताय? मी एकटा पडलो तरी ठासून सांगतोय…’, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
मराठ्यांचे राज्य आहे आणि मग मराठ्यांवर अन्याय का…? मी एकटा पडलो नाही. मला आता मराठ्यांचे नेते फोन करत आहेत. ओबीसींचे नेते सर्व एक झाले आहेत. मग मराठे का एकत्र येत नाहीत म्हणून मी एकटा पडलो आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे
ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एकटा पडलोय तरी मी लढणार… ठासून सांगतोय.. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘मला खूप बोलले आहेत. जे आजू-बाजूला गेलेत त्यांनाही माहिती आहे. मला किती घाण बोलले आहेत. पण मी जातीसाठी पचवतोय. माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की, ओबीसी नेते एक झालेत. मी एकटा पडलोय… मराठ्यांचे नेते काय करताय?’, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांनाच थेट अप्रत्यक्षपणे सवाल केलाय. पुढे मनोज जरांगे पाटील असेही म्हणाले, मी एकटा जरी राहिलो तरी लढणार…हे ठासून सांगतोय, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगत असताना १३ जुलै रोजी धमाका होणार असल्याचा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?

