AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बळीराजा संकटात! अकोला, जळगाव जिल्ह्यात कांदा उत्पादक उद्धवस्त! अलकाळीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान

बळीराजा संकटात! अकोला, जळगाव जिल्ह्यात कांदा उत्पादक उद्धवस्त! अलकाळीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान

| Updated on: Apr 30, 2023 | 8:44 AM
Share

अवकाळी पावसामुळे अकोला जिल्हात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पातुर तालुक्यातील वाघजळी गावातील. संतोष चिंचोळकर यांच्या शेतात पावसाचं पाणी साठल्याने काढणीस आलेला कांदा सडण्याच्या स्थितीत आहे.

अकोला/जळगाव : हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट (Hail) झाली. या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मात्र फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे अकोला जिल्हात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. पातुर तालुक्यातील वाघजळी गावातील. संतोष चिंचोळकर यांच्या शेतात पावसाचं पाणी साठल्याने काढणीस आलेला कांदा सडण्याच्या स्थितीत आहे. तसेच तालुक्यातील अनेक भागातही शेतात पाणी जमा झाल्याने कांदा पिक पूर्णता वाहून गेलं आहे. त्यामुळ आज कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. याचबरोबर जळगाव जिल्ह्यातही काहीसे असेच चित्र समोर येत आहे. येतेही एप्रिल महिन्यातच पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. जळगावच्या मुक्ताईनगर जामनेर बोदवड व इतर भागात अवकाळी गारपीट मुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा कांदा, मका, केळी, व इतर पीक जमीनदोस्त झाला आहे. काही भागात घरांची पडझड, छत उडून गेली आहेत. त्यामुळे तात्काळ या नुकसानीचे पंचनामे मदत जाहिर व्हावी अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Published on: Apr 30, 2023 08:37 AM