सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त; हादरवून टाकणारी माहिती समोर
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेचा दणका आता सोलापूर जिल्ह्यातील भेसळ करणाऱ्यांनाही बसला आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेचा दणका आता सोलापूर जिल्ह्यातील भेसळ करणाऱ्यांनाही बसला आहे. माळशिरस तालुक्यातील जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्रावर छापा टाकून तब्बल 997 किलो पामतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने अकलूज येथील व्यापारी जयकुमार दोशी यांच्याशी संबंधित ठिकाणीही तपास केला. या कारवाईत सुमारे 2 लाख 44 हजार रुपये किमतीचे पामतेल आढळून आले. हे तेल दुधात भेसळ करण्यासाठी आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाने जय हनुमान भाईनाथ दूध संकलन केंद्र तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, 30 मे रोजी राज्यभरात झालेल्या विशेष मोहिमेत 33 आरोपींना अटक करण्यात आली. तसेच 28 आस्थापना सील करण्यात आल्या असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथेही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
Published on: May 31, 2026 06:03 PM
आंदोलनाने सरकार बदलत नाही! ठाकरेंना गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर
डहाणूमध्ये भरदिवसा ज्वेलर्सवर शस्त्र दरोडा; लाखोंचा सोन्याचा ऐवज लंपास
केंद्रातील हालचाली वाढल्या! अमित शहांसह दोन बड्या नेत्यांची तब्बल 3...
फार चिंताजनक! देशात लोकशाही संपली; आंदोलनावर अंधारेंची प्रतिक्रिया

