AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chiplun | आमदार भास्कर जाधवांनी चिपळूणच्या प्रांत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Chiplun | आमदार भास्कर जाधवांनी चिपळूणच्या प्रांत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 2:44 PM
Share

भास्कर जाधवांनी प्रांत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आपण स्वतः रस्त्यावरती असताना अधिकारी गेले कुठे? असा सवाल त्यांनी चिपळूणच्या प्रांत अधिकारी यांना केला आहे.

भास्कर जाधवांनी प्रांत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आपण स्वतः रस्त्यावरती असताना अधिकारी गेले कुठे? असा सवाल त्यांनी चिपळूणच्या प्रांत अधिकारी यांना केला आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांना पाण्याची एक बाटली पुरवू शकत नाही का? काम करणाऱ्यांना विधान मदत तरी करा, अशा कडक शब्दांत त्यांनी फटकारले आहे. दमदाटी केल्याचा आरोप लागलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आज वेगळाच ॲक्शन मॉलमध्ये पाहायला मिळाले. शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांना घेऊन भास्कर जाधव चेक चिपळूण शहरातील साफसफाई करताना पाहायला मिळाले. आपल्यावरील झालेले आरोप फेटाळून लावत भास्कर जाधव यांनी आपण वडीलकीच्या नात्याने तूं दिलेला सल्ला होता अशी प्रतिक्रिया दिली. भोजने आणि आमचे कनिष्ठ कौटुंबिक संबंध आहेत. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही. मी सध्या करत असलेल्या कामच त्यांना उत्तर देईल, कालच्या आरोपानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईला पोहोचेपर्यंत पाच ते सहा फोन आले. बदनामीला घाबरू नकोस आपल्यामधला शिवसैनिक मरु देऊ नकोस असं सांगून पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जा असा सल्ला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे