Devendra Bhuyar | 2013 च्या शेतकरी आंदोलनप्रकरणी आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांची शिक्षा
आमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना 2013 साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम 353 अंतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना आज न्यायालयाने एका प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भुयार यांना 3 महिन्याचा तुरुंगवास आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी पंचायत समिती सदस्य असताना 2013 साली शेतकऱ्यांच्या ज्वारी संदर्भात तीव्र आंदोलन केलं होतं. त्यावेळी दाखल गुन्ह्यात भुयार यांना कलम 353 अंतर्गत अमरावती जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. भुयार यांनी त्यावेळी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांच्या विरोधात वरुड तहसील कार्यालयावर आंदोलन केलं होतं.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
