Mahendra Thorve : तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है?, सेनेच्या आमदारांचा शायरीतून टोला
Mahendra Thorve Slams Sunil Tatakare in Shayari : कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी एका कार्यक्रमात शेरोशायरी करून तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारत गोगवले हे जिंदा दिल व्यक्तिमत्व आहेत. जिंदगी जिंदादिली का नाम है, असं कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हंटलं आहे. तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है? असं देखील महेंद्र थोरवे यांनी म्हंटलं आहे. तर भारत गोगवले यांची मिमीक्री करत आता तुमची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा इशारा देखील थोरवे यांनी दिला आहे. पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर बघा, असंही आमदार थोरवे म्हणाले आहेत.
आमदार महेंद्र थोरवे यांनी भरतशेठ जिंदा दिल आहेत हे सांगताना शायरीतून थेट तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला. जिंदगी जिंदा दिली का नाम हैं, तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता हैं, अशी टीका त्यांनी केली. तसेच ज्या दिवशी तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली त्याचवेळी उलटी गणती सुरू झाल्याचेही ते म्हणाले. तसेच सिंचन घोटाळा फाईल अजून बंद झाली नाही, कायदा आम्हालाही समजतो या शब्दांत त्यांनी सुनील तटकरे यांना इशारा दिला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

