Sanjay Shirsat : राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली, आमदार संजय शिरसाट यांची घणाघाती टिका
Shirsat on Raut News : संजय राऊत ज्याप्रमाणे बेफाम वक्तव्य करत आहेत, ते पाहता, ते शिवसेना संपवायला निघाले असल्याची घणाघाती टीका औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट यांनी केली.
Sanjay Shirsat News : शिंदे गटात सामाली झालेले औरंगाबाद येथील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघाले असल्याचा आरोप त्यांनी केला. एकीकडे उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) हे शिंदे गटाला परत शिवसेनेत येण्याचे आवाहन करत आहेत तर काही जण टीका करत आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट यांनी या टीकेचा कुठलाही परिणाम शिंदे गटातील आमदारांवर होणार नसल्याचे सांगितले. आमच्या मनता कुठलाही संभ्रम नाही. आम्ही आजही शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेबांचा विचार घेऊनच शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे चाललो असल्याचे त्यांनी सांगितले.
गुरुपौर्णिमेला मातोश्रीवर जाणार काय?
गुरुपौर्णिमेला उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का या प्रश्नावर त्यांनी थेट बोलायचं टाळलं.गुरुस्थानी बाळासाहेब ठाकरे यांना मानतो, गुरुपौर्णिमेबद्दल निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) घेतील असे आ. शिरसाट यांनी सांगितले. आज आमचे नेते एकनाथ शिंदे आहे आणि ते सांगतील त्या पद्धतीने आम्ही काम करू असे त्यांनी यावेळी सांगितले.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले

