Suresh Dhas : बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन् एसी रूम, संतोष देशमुखांच्या आरोपींचा तुरुंगात राजेशाही थाट? सुरेश धसांचा खळबळजनक दावा!
Walmik Karad Gang : आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत. संतोष देशमुख यांच्या आरोपींना तुरुंगात राजेशाही थाटात ठेवलं जात असल्याचा आरोप धसांनी केला आहे.
संतोष देशमुखांच्या आरोपींना रोज फोनवर बोलायला दिलं जातं, असं आमदार सुरेश धस यांनी म्हंटलं आहे. इतकंच नाही तर आरोपींना एसी रूम देखील उपलब्ध करून दिले गेले आहेत, असंही सुरेस धसांनी म्हंटलं आहे. वाल्मिक कराड जेल प्रशासनाचा जावई आहे का? कराडला देखील नागपूर किंवा अमरावती कारागृहात पाठवा अशी मागणी यावेळी धस यांनी केली आहे.
आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत. वाल्मिक कराड आणि गँगला तुरुंगात राजेशाही वागणूक दिली जात असल्याचं सुरेश धस यांनी म्हंटलं आहे. तुरुंगात वाल्मिक कराडला आणि संतोष देशमुख यांच्या आरोपींना बोलायला रोज फोन दिले जातात. तसंच आरोपींना राहायला एसी रूम देखील उपलब्ध करून दिलेले आहेत, असं धस यांनी म्हंटलं आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

