Amit Thackeray : आणखी कलमं टाका…अमित ठाकरेंनी पोलीस ठाण्यात जात स्वीकारली नोटीस अन्..
राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्यावरील गुन्ह्यासंबंधीची नोटीस स्वीकारली. नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय लोकार्पण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. नोटीस स्वीकारताना अमित ठाकरे यांनी आपल्या कृतीचा अभिमान असल्याचे सांगितले.
अमित ठाकरे यांनी आज नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्यात हजेरी लावली. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीविना लोकार्पण केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्याबाबतची नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी त्यांनी नेरुळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यापूर्वी नेरुळ पोलिसांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन अमित ठाकरे यांना नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यावेळी त्यांनी ती स्वीकारली नव्हती. अखेर आज त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन नोटीस स्वीकारली. या प्रसंगी बोलताना अमित ठाकरे यांनी आपल्या कृतीचा अभिमान व्यक्त करत, आणखी कलमं टाकायची असतील तर टाका, असे आव्हान दिले.
Published on: Nov 23, 2025 09:51 PM
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
