Avinash Jadhav : ठाणे पालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईच्या मतदार याद्यांचा घोळ, अविनाश जाधवांकडून पोलखोल
ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईच्या मतदार याद्या दिसल्याचा धक्कादायक प्रकार अविनाश जाधवांनी उघड केला आहे. या आरोपानंतर तातडीने याद्या हटवण्यात आल्या. या प्रकारामुळे ठाणे पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेवर विश्वास कसा ठेवायचा, अशी विचारणा जाधव यांनी केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर आगामी २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. ठाणे पालिकेच्या संकेतस्थळावर नवी मुंबई महानगरपालिकेच्या मतदार याद्या दिसत असल्याची पोलखोल जाधवांनी केली. प्रभाग क्रमांक १२ मधील याद्या तपासताना त्यांना ही गंभीर चूक आढळली, ज्यात ऐरोली सेक्टर २ मधील अमृत सर सोसायटीसारख्या नवी मुंबईतील पत्त्यांचा समावेश होता. या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर आणि निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर अविनाश जाधव यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माध्यमांमध्ये हा प्रकार समोर आल्यानंतर काही तासांतच या याद्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आल्या. निवडणुकीच्या तोंडावर समोर आलेला हा भोंगळ कारभार ठाणे पालिकेसाठी अडचणीचा ठरला आहे. जाधव यांनी हा प्रकार ठाण्यात जाहीरपणे उघड करणार असल्याचा इशारा दिला होता.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन

