TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज ठाकरेंचा तातडीने रणदिवे बाईंना फोन

मुंबई : चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेशी अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपर्क साधला आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रणदिवे बाईंच्या (Suman Randive) विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तौक्ते चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं होतं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयानेसुद्धा घेतली आहे. राज ठाकरे यांनी रणदिवे बाईंना फोन करुन त्यांच्या स्वास्थ्याची तसेच इतर गोष्टींची चौकशी केली. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI