MNS Vasant more : पुण्यातील मनसेचे नेते वंसत मोरेंनी घेतली राज ठाकरे यांची भेट

आपापसातले मतभेद मिटवा , एकजूट ठेवा, आपली ताकद विखरू देऊ नका . तसेच नाराज असाल तर माझ्याकडं बोला , प्रसारमाध्यमाशी बोलू नका असा सल्ला दिला आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Jun 09, 2022 | 5:54 PM

पुणे – पुण्यातील मनसेचे नेते वंसत मोरे(Vasant more)यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यासोबत चर्चाही केली आहे. वसंत मोरे यांनी पुन्हा एकदा आपण मनसेतच (MNS)राहणार असल्याचे म्हटले आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावरून वंसत मोरेंनी राजा ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर त्याकडे असलेले शहराध्यक्ष पद काढून घेण्यात आले होते. तसेच वंसत मोरेंना पक्षातील स्थानिक नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या वागणुकीच्या विरोधात त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली होती. आज राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी वसंत मोरे यांना आपापसातले मतभेद मिटवा , एकजूट ठेवा, आपली ताकद विखरू देऊ नका . तसेच नाराज असाल तर माझ्याकडं बोला , प्रसारमाध्यमाशी बोलू नका असा सल्ला दिला आहे.

 

 

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें