AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : “मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा अनिल परबांचा मास्टरस्ट्रोक, आता तेच गुन्ह्याचे मास्टरमाईंड”

| Updated on: Apr 08, 2021 | 11:17 AM
Share

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी लिहिलेल्या पत्रात राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

मनसेचे नगरसेवक फोडले तेव्हा अनिल परबांचा (Anil Parab) मास्टर स्ट्रोक म्हणत होते. मात्र अनिल परब हे गुन्ह्याचे मास्टरमाईंडदेखील आहेत. ते स्वतः वकील आहेत त्यांना शपथ घेऊन खोटं बोलू नये हे माहिती आहे. शपथेनंतर खोटं बोलून ते गुन्हा करत आहेत, असा हल्लाबोल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी लिहिलेल्या पत्रात राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (MNS Leader Sandeep Deshpande attack on Maharashtra Minister Anil Parab after Sachin Vaze letter )

परब यांनीही आपल्याला वसूली करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट वाझे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाझेंनी केलेल्या या आरोपांमुळेच अनिल परब यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दोन मुलींची शपथ घेण्याची वेळ आली आहे. परब यांनी वाझे यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले आहेत.

VIDEO : संदीप देशपांडे यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

संबंधित बातम्या:

अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण

Sachin Vaze Case : बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे- अनिल परब

वकील साहबकी लग गयी, आता ‘एलिजीबल बॅचलर’तर्फे मानहानीची नोटीस कोण पाठवणार? : नितेश राणे

Published on: Apr 08, 2021 11:17 AM