AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वकील साहबकी लग गयी, आता ‘एलिजीबल बॅचलर’तर्फे मानहानीची नोटीस कोण पाठवणार? : नितेश राणे

सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांवरुन नितेश राणेंनी निशाणा साधला. (Nitesh Rane Aditya Thackeray Anil Parab)

वकील साहबकी लग गयी, आता 'एलिजीबल बॅचलर'तर्फे मानहानीची नोटीस कोण पाठवणार? : नितेश राणे
नितेश राणे, आदित्य ठाकरे, अनिल परब
| Updated on: Apr 08, 2021 | 8:32 AM
Share

मुंबई : “शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून मला मानहानीची नोटीस येणार का, वकील साहेबांची तर लागली आहे ” अशा आशयाचं ट्वीट करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि परिवहन मंत्री अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्यावर निशाणा साधला. निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. (BJP MLA Nitesh Rane taunts Minister Aditya Thackeray over allegations on Minister Adv Anil Parab by Sachin Vaze)

नितेश राणे यांचे ट्वीट काय?

“मी विचार करत होतो… मला शहरातली सर्वात एलिजिबल आणि उच्चशिक्षित बॅचलरकडून अजूनही मानहानीची नोटीस येणार का? आतुरतेने वाट पाहतोय. वकील साहेबांची तर काल लागली… आता नोटीस कोण बनवणार?” असा उपरोधिक सवाल नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.

नितेश राणेंनी कालही ट्विटरवरुन निशाणा साधला होता. “ओ परिवार मंत्री.. शपथ काय घेता.. शेंबूड पुसा.. राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा.. पुरावे तयार आहेत.. आता वस्त्रहरण अटळ आहे!!” असे ट्वीट नितेश राणेंनी केले होते.

मनसे नेते संदीप देशपांडे यांचीही टीका

(BJP MLA Nitesh Rane taunts Minister Aditya Thackeray over allegations on Minister Adv Anil Parab by Sachin Vaze)

अनिल परब यांच्यावर आरोप काय?

निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टात एक पत्र देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. “अनिल परब यांनी आपल्याला जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी) कडून 50 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून 50 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता” असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.

पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुलीचे आदेश

“अनिल परब यांनी जानेवारी 2021 मध्ये पुन्हा मला बोलावून घेतलं. मुंबई पालिकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. त्यांनी मला 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी कमीत कमी दोन कोटी रुपये वसूल करायला सांगितलं” असा दावा वाझेंनी केला आहे. अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी मला वसुली करायला सांगितल्याबद्द्ल मी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सांगितलं होतं. त्यावर सिंग यांनी या मागण्या मान्य करू नका म्हणून सांगितलं होतं, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे.

आरोप फेटाळले

अनिल परब यांनी सचिन वाझे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून त्यांना माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असं भाजपला आधीच माहिती होतं, असं सांगतानाच मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं परब यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या:

अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण

Sachin Vaze Case : बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे- अनिल परब

अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठीही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहावी लागेल का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

(BJP MLA Nitesh Rane taunts Minister Aditya Thackeray over allegations on Minister Adv Anil Parab by Sachin Vaze)

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.