अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठीही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहावी लागेल का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. ('Will we again have to wait for court orders before your minister anil parab resigns?')

अनिल परब यांच्या राजीनाम्यासाठीही कोर्टाच्या आदेशाची वाट पाहावी लागेल का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 8:06 PM

मुंबई: निलंबित सहायक निरीक्षक सचिन वाझे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. परब यांनीही आपल्याला वसुलीचे आदेश दिले होते, असा धक्कादायक आरोप केला आहे. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (‘Will we again have to wait for court orders before your minister anil parab resigns?’)

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?, असा सवाल पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे.

सूत्रधार कोण हे शोधावं

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही याप्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वाझे हे हिमनगाचं टोक आहे. मुख्य सूत्रधार वेगळाच आहे, हे हँडलर्स कोण आहेत. ते बाहेर येणं महत्त्वाचं आहे, असं दरेकर यांनी म्हटलं आहे. या सर्व गोष्टी आता लवकर बाहेर येतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

परबांवर आरोप काय?

सचिन वाझे यांनी आज एनआयए कोर्टात एक पत्रं देऊन परब यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. परब यांनी मला जुलै-ऑगस्ट 2020 मध्ये मला बोलावून घेतलं होतं. यावेळी त्यांनी सैफी बुऱ्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्ट (एसबीयूटी)कडून 50 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. या एसबीयूटीची चौकशी सुरू होती. आधी त्यांनी मला या एसबीयूटी प्रकरणाची चौकशी करून ट्रस्टींसोबत चर्चा करायला सांगितलं होतं. नंतर केस बंद करण्याच्या नावाखाली एसबीयूटीकडून 50 लाख रुपये वसूल करण्यास सांगितले. त्याला मी नकार दिला. कारण एसबीयूटीमध्ये मी कुणालाच ओळखत नव्हतो. तसेच चौकशीशी माझा काही संबंधही नव्हता, असं वाझेंनी या पत्रात म्हटलं आहे.

पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुलीचे आदेश

त्यानंतर परब यांनी जानेवारी 2021मध्ये पुन्हा मला बोलावून घेतलं. मुंबई पालिकेच्या काही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यास सांगून त्यांच्याकडून प्रत्येकी दोन कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. त्यांनी मला 50 कंत्राटदारांकडून प्रत्येकी कमीत कमी दोन कोटी रुपये वसूल करायला सांगितलं, असा दावा वाझेंनी केला आहे. अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी मला वसुली करायला सांगितल्याबद्द्ल मी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सांगितलं होतं. त्यावर सिंग यांनी या मागण्या मान्य करू नका म्हणून सांगितलं होतं, असा दावाही या पत्रात करण्यात आला आहे.

आरोप फेटाळले

परब यांनी वाझे यांनी केलेले सर्वा आरोप फेटाळून लावले आहेत. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवस आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून त्यांना माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता, त्यामुळे तिसरी विकेट काढणार, असं भाजपला आधीच माहिती होतं, असं सांगतानाच मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. हवं तर माझी नार्को टेस्ट करा. मी कधीही वाझेंना अशा प्रकारच्या वसुलीचे आदेश दिले नव्हते, असं परब यांनी स्पष्ट केलं आहे. (‘Will we again have to wait for court orders before your minister anil parab resigns?’)

संबंधित बातम्या:

अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण

Sachin Vaze Case : बाळासाहेबांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे- अनिल परब

EXCLUSIVE : अनिल देशमुखांनी 2 कोटी मागितले, सचिन वाझेंचा लेटरबॉम्ब, मविआच्या 3 मंत्र्यांवर गंभीर आरोप

(‘Will we again have to wait for court orders before your minister anil parab resigns?’)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.