AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sandeep Deshpande : कोण केडिया, हे XXX, मराठीचा अपमान करणाऱ्यांची देशपांडेंनी काढली लायकी अन् दिला थेट इशारा, म्हणाले....

Sandeep Deshpande : कोण केडिया, हे XXX, मराठीचा अपमान करणाऱ्यांची देशपांडेंनी काढली लायकी अन् दिला थेट इशारा, म्हणाले….

| Updated on: Jul 05, 2025 | 9:42 AM
Share

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक येणार आहेत. लोकांना प्रचंड उत्सुकता आहे. ठाकरे बंधू नेमका काय संदेश देणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. अशातच मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडे पुन्हा आक्रमक झालेत.

आज मुंबईत ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा होत आहे. दोन दशकानंतर एकाच व्यासपीठावर आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठी माणसाची एकजूट ही १९६० नंतर आज महाराष्ट्रात विजयी मेळाव्याच्या निमित्ताने होताना दिसतेय. त्यामुळे आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे. त्याचा आनंद घेऊया. महाराष्ट्रात मराठीच चालणार आणि मराठीचाच आवाज होणार, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

व्यावसाय़िक सुशील केडीया यांच्या मराठी न शिकण्याच्या भूमिकेवर देशपांडे यांना सवाल केला असता त्यांनी चांगलंच फटकारलंय. ‘कोण केडिया, हे लुख्खे XXX आहेत. यांची लायकी काय हे शिकवणार? महाराष्ट्रात राहून जर मराठीचा अपमान केला तर कानाखालीच पडणार’, असा थेट इशाराच माय मराठीचा अपमान करणाऱ्यांना संदीप देशपांडे यांनी दिला. पुढे ते असेही म्हणाले, जाणीवपूर्वक अशा लोकांना पुढे आणलं जातंय. त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. जो मराठी भाषेचा अपमान करणार, त्याच्यावर एकतर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नाहीतर आम्ही करणार. मराठी भाषेचा अपमान आणि आग्रह या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचेही देशपांडे म्हणाले.

Published on: Jul 05, 2025 09:41 AM