अमित ठाकरे माझ्यापेक्षा लहान, ते ज्या प्रकारे वागले..; प्रकाश महाजनांनी दिली मोठी अपडेट
आज अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चर्चेचं तपशील सांगणार नाही, मात्र माझ्याकडून काही गोष्टी संतापाच्या भरात घडल्या. आता मला कोणताही राग नाही. अमित ठाकरे माझ्यापेक्षा लहान आहेत. पण ते माझ्याशी ज्या प्रकारे वागले, त्यामुळे माझा सगळा राग गळून पडला आहे, असं मनसे नेते प्रकाश महाजन यांनी म्हंटलं आहे. प्रकाश महाजन हे पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी त्याबद्दल उघडपणे बोलून देखील दाखलवलं होतं. त्यानंतर आज अमित ठाकरे आणि प्रकाश महाजन यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर प्रकाश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, सगळ सुरळीत चाललं आहे. त्यांनी मला काम करायला सांगितलं. राग मावळले आहेत. ठीक आहे उत्साहाच्या भरात माझ्याकडून काही गोष्टी झाल्या. प्रकाश महाजन बोलला म्हणजे राज ठाकरे बोलले असे लोक मानतात. काही भूमिका मांडताना विचारून मांडायला हवे होते. पक्षाने व्यासपीठ दिलं. अत्यंत समाधानाने मी खाली उतरलो आहे. त्याच ताकदीने मनसे मध्ये काम करेन. योग्य ती दखल घेऊ अस देखील सांगण्यात आलं आहे. शिबिराची प्रसिद्धी वेगळ्या अर्थाने झाली शिबिराचा अर्थच वेगळा होता. अमित ठाकरे यांचा फोन आल्यानंतर सगळ्याच राग निवळला. ते माझ्या संपर्कात असतात कायमच. मी त्यांना बोललो काही गोष्टी, काही गोष्टी हळूहळू सुटतील. राजसाहेब बोलवतील त्या दिवशी भेटणार. अमितजी माझी बाजू राजसाहेबांकडे पोहचवतील. मी मनसेत सक्रिय राहणार खात्री बाळगा, असंही यावेळी प्रकाश महाजन यांनी सांगितलं.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

