MNS News : अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
Ambarnath News : अंबरनाथमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत मनसेने गोंधळ घातला आहे. अमराठी बँक मॅनेजरने उलट उत्तर दिल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले.
अंबरनाथमधील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत मनसेने गोंधळ घातला आहे. अमराठी बँक मॅनेजरने उलट उत्तर दिल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. तसंच या मॅनेजरने मराठी न शिकल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो कि नाही, यावर मनसे आक्रमक झाली आहे. याबाबतचे पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते. त्यावेळी बँक मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत या अमराठी बँक मॅनेजरला चांगलच धारेवर धरलं. तसंच मराठी न शिकल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक

