Raj Thackeray Video : ‘मराठी जनता दुधखुळी नाही, जोशीबुवा असल्या काड्या…’ भैय्याजी जोशींच्या ‘त्या’ वक्तव्यावर राज ठाकरेंची FB पोस्ट
भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी एक फेसबुक पोस्ट केली असून भैय्याजी जोशींचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला आहे. भैय्याजी जोशींच्या वक्तव्याशी राज्यातील भाजप सहमत आहे का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय.
भैय्याजी जोशींच्या वक्तव्याशी राज्यातील भाजप सहमत आहे का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. जोशी बुवांनी अशा काड्या करू नये, असं म्हणत राज ठाकरे यांनी असं भैय्याजी जोशींना खोचक टोला लगावला आहे. भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंनी एक फेसबुक पोस्ट केली असून भैय्याजी जोशींचा चांगलाच समाचार त्यांनी घेतला आहे.
अशी आहे राज ठाकरेंची FB पोस्ट…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भैय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भैय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भैय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का? सध्या MMR रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत. हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं? आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला, त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे!

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
