मराठा आंदोलकांच्या भेटीसाठी निघालेल्या राज ठाकरे यांचा ताफा अडवला अन्…
VIDEO | जालन्याच्या दिशेने जात असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा राजापूर जवळ मराठा आंदोलकांनी अडवला, यावेळी राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना आवाहन केलं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ते पुढे रवाना झाले
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील आंतरवाली सराटी या गावात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक जिल्ह्यात जिल्हा बंदी पुकारण्यात आली आहे. अशातच जालन्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळातील नेते मंडळी जालन्यात दाखल होत आंदोलकाची भेट घेत आहेत. आज राज ठाकरे देखील जालन्यात दाखल होत मराठा आंदोलकांची भूमिका जाणून घेण्यासाठी येत असताना त्याचा ताफा वाटेतच अडवण्यात आला. राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूरजवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला. यावेळी कारच्या खाली उतरून राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना शांत राहण्याचेही आवाहन केले.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?

